*नागणवाडीत पती-पत्नी शेतमालकास काठ्या खुरप्या गजाने मारहान करून केले गंभिर जखमी*
भुदरगड तालुक्यातील नागणवाडी गावच्या ज्ञानदेव बाबुराव पंन्हाळकर (वय ७३) व कांचनमाला पंन्हाळकर या पती पत्नीना, 6/12/2024 रोजी येथील त्यांच्या जमीनीच्या वादावरून काठी खुरपे,गज आदि तिक्ष्ण हत्यारांचा वापर करून शेतीच्या शेजारील कुटुंबियांनी गंभिर जखमी केले आहे. याबाबत आरोपी तानाजी कुंडलिक कदम, तुकाराम विठू कदम, भिकाजी संभाजी कदम, सुरज ज्ञानदेव कदम, प्रमिला भिकाजी कदम , लक्ष्मीबाई उर्फ तुळसाबाई कुंडलिक कदम व शाहूबाई तुकाराम कदम यांचे वर भुदरगड पोलीस ठाण्यात कलम ३५६,११८(२),११८(१),३२४(४)(५), १८९ (१ ते ४) व १९१ (२),१९१(३) नुसार गुंन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जखमीवर कोल्हापूर च्या सीपीआर रूग्णालयातउपचार करण्यात आले तर सध्या हे जखमी गारगोटी च्या शिकलगार हॉस्पीटल मध्ये उपचार घेत आहेत. महिला जखमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
यातील हकीकत अशी की,यातील फिर्यादी कांचनमाला ज्ञानदेव पंन्हाळकर या त्यांच्या नागणवाडी (ता भुदरगड) येथील भुमापन गट क्र ४१ मध्ये देसकर नावाच्या आपल्या शेतात, पिकातील तन काढत होते.याच वेळी वरील आरोपी नं १ ते ७ हे याच मालकाच्या शेतात दांडगाव्याने ट्रैक्टर घालून रस्ता करत होते.हेअतिक्रमण पाहून फिर्यादी कांचनमाला ज्ञानदेव पंन्हाळकर यांनी सदर आरोपींना काम थांबविण्याची विनंती केली,प्रकरण न्यायालयात आहे,थांबा असे सांगितले असता चिडून जावून या सात आरोपींनी फिर्यादी कांचनमाला पंन्हाळकर (वय वर्षे ६४) हिचेवर, काठी, खुरपे, गज अशा प्राणघातक हत्याराने जबरी मारहान केली.जखमी अवस्थेत फिर्यादी कांचनमाला पंन्हाळकर यांनी आरडाओरडा सुरू केल्यावर त्यांचे पती ज्ञानदेव पंन्हाळकर हे पत्नीला सोडवण्यास आले असता या फिर्यादींनी मिळून त्यांच्यावरही अशा प्रकारे जबरी हल्ला केला व त्यांनाही ही गंभिर जखमी केले. दरम्यान ग्रामस्थ धावत आले आणि आरोपी निघून गेले. जखमींना गारगोटी उपजिल्हा रूग्णालयात उपचार दाखल केले.दरम्यान सदर उपचार हे गंभिर असल्याने येथील डॉक्टरांनी या फिर्यादी जखमीस कोल्हापूर च्या सीपीआर रूग्णालायात पाठवले.
पोलीस निरीक्षक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली , अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मगदूम ,पी एस आय जीवन पाटील हे अधिक तपास करत आहेत.दरम्यान आरोपींना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाला आहे.