कुडाळ तलाठी कार्यालय येथील झाडे गेली चोरीला ; तहसीलदार यांच्याकडे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केली चौकशीची मागणी…

*कुडाळ तलाठी कार्यालय येथील झाडे गेली चोरीला ; तहसीलदार यांच्याकडे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केली चौकशीची मागणी…*

 

कुडाळ येथील जुना जिल्हाधिकारी बंगला व सध्याचे तलाठी कार्यालय येथील साग व आकेशियाच्या चोरीला गेलेल्या झाडांची योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ येथील जुना मा. जिल्हाधिकारी बंगला व सध्या तलाठी कार्यालय असलेल्या ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयाची इमारत उभारण्यात येत आहे. या परिसरामध्ये इमारतीचे काम करण्यापूर्वी असलेली साग व आकेशियाची झाडे तोडण्यात आली होती. आणि ही तोडलेली झाडे या परिसरात ठेवण्यात आली होती. शनिवार ७ डिसेंबर २०२४ रोजी ही झाडे संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी घेऊन नेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणाची आपल्याकडून सखोल चौकशी व्हावी तसेच ही इमारत उभारण्यासाठी व झाडे तोडण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. अशी माहिती मिळत आहे. तरी या प्रकरणाची आपल्याकडून योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी कुडाळ तहसीलदारांकडे केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत कुडाळ प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here