*वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ.*
भाजपा च्या मठ गावच्या सदस्य अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी बैठक स्वयंभु मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले कि , सावंतवाडी विधानसभेमध्ये भाजप चे एक लाख सदस्य बनविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले असुन वेंगुर्ले तालुक्यात किमान २५००० सदस्य नोंदणी होणे आवश्यक आहे . म्हणूनच वेंगुर्लेत प्रत्येक गावामध्ये जाऊन सदस्य नोंदणी शुभारंभ केला जात आहे .
यावेळेस तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी या अभियानात भाजप च्या सर्व लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे , असे आवाहन केले .
या बैठकीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस व सिंधुदुर्ग जिल्हयातुन आमदार नितेश राणेंची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला .
यावेळी ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर , सोसायटीत चेअरमन सुभाष बोवलेकर , ता. का.का.सदस्य अजित नाईक , बुथ प्रमुख अनिल तेंडोलकर व उमेश धुरी , महेश धुरी , प्रसाद सावंत , उमेश मठकर , रविंद्र खानोलकर , बबली मठकर , दिवाकर गावडे , स्वप्नील मठकर , रंजन कडुलकर , दामु मठकर , अवी खानोलकर , मिलिंद मठकर इत्यादी उपस्थित होते .