*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांचे दिव्यांग बांधवांच्या वतीने अभिनंदन !!!*
” बेस्ट सपोर्ट फाॅर व्हिसेबल पुरस्कार ” मिळाल्याबद्दल दिव्यांग बांधवांकडुन अभिनंदन.
अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग महासंघ , महाराष्ट्र शाखा – जिल्हा सिंधुदुर्ग च्या सहकार्यातून ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग फाऊंडेशन व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य सचिव बाळासाहेब पाटील यांनी सन २०२४ – २५ चा राज्यस्तरीय ” बेस्ट सपोर्ट फाॅर हिसेबल पुरस्कार ” प्रसंन्ना देसाई यांना जाहीर केला .
विविध क्षेत्रात दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्तींनी दिव्यांगांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन , त्यांच्या गौरव म्हणून हा पुरस्कार ३ डिसेंबर ला जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून हा राज्यस्तरीय पुरस्कार कमिटीद्वारे बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केला .
भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा प्रभारी म्हणून संघटनात्मक जबाबदारी पार पाडत असताना दिव्यांगांसाठी विविध उपक्रम प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई घेत असतात , ह्याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपा कार्यालयात येऊन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट , दिव्यांग सेनेचे मनोज सातोसे व संजय देसाई , भाजपा दिंव्यांग आघाडीचे वेंगुर्ले संयोजक भरत परब यांनी प्रसंन्ना देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .