सावंतवाडी ते आंबोली जाणारे रोडवर दानोळी कुंभेश्वर येथे SUV 500 व मोटरसायकल यांच्यात अपघात…मोटर सायकल स्वाराचे पायास गंभीर दुखापत..
आज दिनांक 22/12/2024 रोजी 17. 20 वाजता चे सुमारास सावंतवाडी ते आंबोली जाणारे रोडवर दानोळी कुंभेश्वर येथे, हॉटेल तन्वी पासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे १०० मीटर अंतरावर, SUV 500 गाडी नंबर MH07 Q 7946 व मोटरसायकल पॅशन प्रो नंबर MH07 Z 5447 यांचेत अपघात झाला. सदर अपघातात मोटर सायकल स्वाराचे पायास गंभीर दुखापत झाली असून, सदर इसमास उपचारासाठी खाजगी वाहनाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बांदेकर आणि पोलीस हवालदार गोसावी यांनी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे नेले. सदर अपघाताबाबत सावंतवाडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भरत जाधव व आंबोली दुरक्षेत्र अंमलदार HC 937 देसाई यांना कळविण्यात आले. सदर ठिकाणची वाहने बाजूला करून, वाहतूक सुरळीत करण्यात आली.