*माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नाने राजापूर पोष्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण पुन्हा सुरु*

Made with LogoLicious Add Your Logo App

*माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नाने राजापूर पोष्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण पुन्हा सुरु*

 

माजी केंद्रीय मंत्री ना. सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नानंतर कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने अचानक बंद केलेले राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र  ( पी आर एस ) पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील समस्त रेल्वे प्रवाशांची  आरक्षण सेवेबाबत होणारी गैरसोय दूर झाली आहे.

कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र ( पी आर एस ) अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या विरोधात  चौफेर मोहळ उठले होते.रेल्वे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत्या. कोकण रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करण्यात यावा  आणि पोस्ट कार्यालयातील आरक्षण सुविधा केंद्र पूर्ववत सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. दरम्यान  माजी केंद्रीय रेल्वेमंत्री, आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार ना. सुरेश प्रभू यांचे याकामी लक्ष वेधण्यात आले.ना. प्रभू यांनी त्यामध्ये लक्ष घातले त्यानंतर त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह अधिकारी वर्गाशी संपर्क साधून कोकण रेल्वेच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे समस्त रेल्वे प्रवाशांचे कसे नुकसान होत आहे ते त्यांनी पटवून दिले. ना. प्रभूंनी मांडलेल्या भूमिकेनंतर सूत्रे हलली आणि त्यानंतर कोकण रेल्वे शासनाला घेतलेला तो निर्णय रद्द केला आणि राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र ( पी आर एस ) पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे समस्त  रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

राजापूर रेल्वे आरक्षण सुविधा केंद्राच्या मशिनरी मधील विद्युत पुरवठा बंद होऊन तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तो देखील दूर झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जोमाने राजापूर पोस्ट कार्यालयातील  रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ना. सुरेश प्रभू त्यांनी लक्ष घालून हे केंद्र पूर्ववत सुरू व्हावे म्हणून प्रयत्न केल्याबद्दल रेल्वे प्रवाशांमधून ना.प्रभू यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here