*मराठा महासंघाची नोकरभरतीतील बीड पैटर्न विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक*
५ मे: सिंधुदुर्गनगरी
संभाजी नामदेव खाडे याला २००६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी वैभववाडी येथे लिपिक म्हणून नेमणूक केली होती आणि आता सध्या तो अव्वल कारकून या पदावर कणकवली तहसील कार्यालयात कार्यरत आहे. सदरच्या व्यक्तीचे जिल्ह्याच्या अनुकंपा पात्र यादीमध्ये नाव नसताना सुद्धा त्याला निवासी जिल्हाधिकारी यांनी बोगसरित्या नेमणूक दिलेली आहे, गेले २००६ सालापासून गेली २० वर्ष तो या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. ही जी काय फसवणूक केली ही बाब सध्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिल्यावर त्यांनी या संदर्भामध्ये खाडे विरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी मराठा महासंघाला दिले आहे.
त्याचबरोबर अलीकडेच झालेल्या लिपिक, तलाठी संवर्गाच्या ज्या नेमणुका झाल्या त्यामध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून सर्व तलाठी हे बिड जिल्ह्यातील आल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले आणि हे कुठेतरी संशयास्पद आहे, संपूर्ण राज्यातून एकच जिल्ह्याचे प्रकल्पग्रस्त हे कसे काय एका जिल्ह्यात लागतात, राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त का यादीत दिसत नाहीत याबद्दल पण चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे, जर जिल्हाधिकारी यांनी यावर पुढील ८ ते १० दिवसात कारवाई केली नाही तर, मराठा महासंघ अधिक उग्रतेने या संदर्भात अधिक तीव्र आंदोलन पुकारणार असे मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सांगितले, त्यावेळी मराठा महासंघ सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री विनय गायकवाड, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री संतोष परब, तानाजी सावंत , प्रशांत पालव, नंदू गावडे, श्री निकम इत्यादी मराठा कार्यकर्ते उपस्थित होते



















