राज्यातील “सागर मित्र” कर्मचाऱ्यांना मुदत वाढ मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केंद्र आणि राज्य सरकार सोबत समन्वय साधत घेतली मुदत वाढ

१७३ कर्मचाऱ्यांना सेवेत मुदत वाढ,कर्मचाऱ्यांनी मानले मंत्री नितेश राणे यांचे आभार

कणकवली;

मत्स्य विभागांतर्गत सेवा देत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील बहुउद्देशीय समर्थन सेवा देणाऱ्या “सागर मित्र” याच्या सेवेत मुदत वाढ करण्यात आली आहे. २०२५ – २६ या एक वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय घडवून ही एक वर्षाची नियुक्ती वाढवून घेतली आहे. त्यामुळे राज्यातील १७३ कर्मचाऱ्यांना सेवेत मुदत वाढ दिली आहे.या निर्णयानंतर सिंधुदुर्गातील सागर मित्रांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आभार मानले.

   या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य सरकारचे उपसचिव किशोर जकाते यांनी जाहीर केले आहे. एक वर्षाची नियुक्ती वाढवून दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “सागर मित्र” कर्मचाऱ्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here