*गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक;मंत्री नितेश राणे*

*गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक;मंत्री नितेश राणे*

 

*इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची सकारात्मकता*

*कॅबिनेट मध्ये लवकरच घेणार मंजुरी*

 

मुंबई – (प्रतिनिधी)इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या समवेत गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, तसेच गाबीत समाज संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

या बैठकीत बोलताना मंत्री श्री. राणे म्हणाले, कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मुंबईत प्रामुख्याने गाबीत समाजाचे वास्तव्य आहे.गाबीत समाज हा पारंपरिकरित्या मासेमारी आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे. बदलत्या काळानुसार आणि आधुनिकीकरणामुळे त्यांच्या पारंपरिक व्यवसायांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. गाबीत समाजाला आधुनिक व्यवसायांमध्ये आणण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी स्वतंत्र महामंडळाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत शासनाच्या वतीने सकारात्मक प्रयत्न केले जातील असे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.

आमदार निलेश राणे यांनी, गाबीत् समाजाची ही महामंडळाची मागणी खूप जुनी असून आता त्यासाठी मंत्री नितेश राणे व मंत्री अतुल सावे यांनी मंत्रिमंडळ स्तरासह सर्वच स्तरावर विशेष प्रयत्न करावेत असे सुचित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here