*शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी मालवण तालुक्यातील वायंगवडे गावातील ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाला फोडली वाचा…..*

*शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी मालवण तालुक्यातील वायंगवडे गावातील ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाला फोडली वाचा…..*

 

शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांची मालवण तालुक्यातील वायंगवडे गावातील ग्रामस्थांना गेली १० वर्ष धान्य भेटत नव्हते,ही समस्या शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख श्री.उदय गावडे यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिली,ही बाब गंभीर असल्याने शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे या समस्येवर लक्ष वेधले, व रीतसर निवेदन दिले.या निवेदनाची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लागलीच दखल घेऊन मालवण तहसीलदार यांच्या प्राप्त अहवालानुसार १. शुभांगी भाऊ घाडी, २. सुजाता सुर्यकांत कदम, ३. महादेव दत्ताराम परब, ४. शर्मिला शंकर घाडी यांची नावे प्राधान्य कुटुंब यादी मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. उर्वरीत लाभार्यांना पुरवठा पत्रिकेवरील उत्पन्नानुसार पुढील इष्टांक आल्यानंतर समाविष्ट करण्यात येईल असे या पत्राच्या माध्यमातून आश्र्वासन दिले.तहसीलदार यांचेकडील शिल्लक इष्टांक पाहता PHH 5870 एवढा इष्टांक शिल्लक असलेचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिसुन आले. शिल्लक इष्टांक असुनही आपण संबंधीत लाभार्थ्यांना लाभ का दिला नाही अशी विचारणा तहसीलदार यांना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्राच्या माध्यमा तून केली.तसेच तात्काळ शिल्लक इष्टांकाप्रमाणे संबंधीतांना शासनाच्या निकषाप्रमाणे धान्य देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार यांना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक यांच्या कामाचा धडाका पाहून अधिकारी तसेच वायंगवडे गावातील ग्रामस्थांनी रुपेश पावसकर तसेच उपतालुकाप्रमुख श्री.उदय गावडे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here