छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट……..

राजकारणातली मोठी घडामोड

छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट……..

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. भुजबळ हे वेळ न घेता अचानक पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने त्यांना या भेटीसाठी वेटिंग करावे लागले अशी माहिती आहे. बराच वेळ वेटिंग केल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर या दोघांमधील बैठक आता संपन्न झाली आहे.

काल गंभीर आरोप अन् आज पोहोचले भेटीला

रविवारी बारामतीमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करत आहेत. तसेच बारामतीमधून फोन आला म्हणून विरोधी पक्षनेते मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत”, असे अनेक गंभीर आरोप भुजबळांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी ते पवारांच्या भेटीला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

….तरी शरद पवार यांनी दिली भेटीची वेळ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती ठीक नाही. ते कोणाचीही भेट घेत नाहीयेत. पण शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना भेटीची वेळ दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here