*शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम आलेला श्रीनिवास मयेकर या विद्यार्थ्याचा भाजपा च्या वतीने शाळेत जाऊन सत्कार*
वेंगुर्ले शहरातील बाळाजी सिताराम नाईक म्हणजेच शाळा नं.३ चा विद्यार्थी श्रीनिवास बाबूराव मयेकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत ८६.५७ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला . तसेच तो शहरी विभागातून शिष्यवृत्तीधारक ठरला याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला .
शाळा नंबर ३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो , कारण या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करतात त्यामुळे ही शाळा वेंगुर्ले तालुक्यात अग्रगण्य शाळा गणली जाते .
यावेळी मुख्याध्यापक शंकर सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती कुडाळकर , उपाध्यक्ष दिनकर मयेकर , रुचीरा दाटेकर , पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष अमृत काणेकर , निकिता मयेकर , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ , उदय महाजन , वैभव भोसले तसेच शिक्षक राकेश देसाई , शिक्षिका मानसी वाईकर , शिक्षिका रुही जुवेकर तसेच पालक उपस्थित होते .