*आषाढी एकादशीनिमित्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान*
दरवर्षी भाजपा च्या वतिने चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिरात वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान केला जातो . ह्यावर्षीही आषाढी एकादशीनिमित्त दहा जेष्ठ वारकऱ्यांचा सन्मान भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला .
सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांचा सन्मान करण्यात आला व त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जेष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी वारकरी मंडळींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले की राज्य सरकारने दिंड्यांसाठी २०,००० रु चे अनुदान मंजुर केले आहे . तसेच महायुती सरकार ने वारकऱ्यांसाठी ” मुख्यमंत्री वारकरी महामंडळ ” स्थापन केले असुन या मार्फत तीर्थक्षेत्राचा विकास , कीर्तनकार , वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा , वैद्यकीय मदत , विमाकवच ,पायाभूत सुविधा इत्यादी सुविधा या महामंडळामार्फत पुरविल्या जाणार आहेत . तसेच पायी वारी करणाऱ्या जेष्ठ वारकऱ्यांना शासनाकडून पेन्शन मिळणार असल्याचे सांगीतले . तसेच राज्यातील त्याचबरोबर देशातील प्रमुख तीर्थस्थळांचे दर्शन जेष्ठ नागरिकांना घेता यावे याकरीता प्रती व्यक्ती ३०,००० रुपये इतका प्रवास खर्च शासनाकडून दिला जाणार आहे . त्यामुळे हरिभक्तांची वारी सुखद करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्षा अँड. सुषमा खानोलकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , महीला मोर्चा अध्यक्षा सुजाता पडवळ , महीला मोर्चा जि.उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर , महीला मोर्चा शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व पुंडलिक हळदणकर व निलेश गवस , किसान मोर्चाचे सत्यवान पालव तसेच बहुसंख्य वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती .