*दीपक केसरकारांसारखं ज्येष्ठ नेतृत्व लाभलेल असताना अन्य नेत्यांनी सिंधुदुर्गात लुडबुड करू नये- आमदार नितेश राणे*

Made with LogoLicious Add Your Logo App

*दीपक केसरकारांसारखं ज्येष्ठ नेतृत्व लाभलेल असताना अन्य नेत्यांनी सिंधुदुर्गात लुडबुड करू नये- आमदार नितेश राणे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीपक केसरकर हे एक अस ज्येष्ठ नेतृत्व आहे की, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तर ते काम करतच आहेत; पण त्यासोबत अनेक महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि शिवसेनेला दीपक केसरकरांसारख ज्येष्ठ नेतृत्व लाभलेल असताना इतर नेत्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लुडबुड करू नये. कारण महायुतीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, दीपक केसरकर असताना आम्हाला अन्य कोणाचीच गरज नाही असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी कणकवली इथं युवा संदेश प्रतिष्ठानच्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केला..

लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी दीपक केसरकरांनी जी मेहनत घेतली, त्याची प्रचिती विधानसभा मतदारसंघातून दिसली आणि दीपक केसरकर यांनी घेतलेल्या भूमिकेचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा जवळून अनुभव आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आला, असे नितेश राणे यांनी अभिमानाने सांगितले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here