*वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप*

Made with LogoLicious Add Your Logo App

*वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप*

 

दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये तिरंगा फडकवण्यात येतो. एकूणच सर्व भारतीय उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करतात. तर पंतप्रधान मान.नरेंद्र मोदीजींनी २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे .

भारतीय जनता पक्षाने ही या अभियानात सक्रीय सहभाग घेऊन ’हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यालयात नागरिकांना तिरंग्याचे वाटप अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .

अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. तसेच लोकमानसात जाज्वल देशभक्ती चे स्फुलिंग कायम तेवत रहावे यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्द आहे,यासाठी राष्ट्राभिमान जागृत करून वृध्दींगत करण्यासाठी भाजपा वेगवेगळे उपक्रम राबवीत असतो . वेंगुर्ल्यात यावर्षीही देशाच्या सीमेवर सेवा देणाऱ्या माजी सैनिकांचा विशेष सन्मान केला जाणार असून या माजी सैनिकांच्या नेतृत्वात खर्डेकर महाविद्यालय ते तहसिलदार कार्यलय अशी तिरंगा पद यात्रा निघणार आहे. तरी या तिरंगा पद यात्रेत सर्व देशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा वतीने ” हर घर तिरंगा ” अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here