*♿सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना सुवर्णसंधी ✨*

*♿सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना सुवर्णसंधी ✨*

 

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजने अंतर्गत कुडाळ तालुक्याच्या दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे -कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एम.एस.आय.डी किट, श्रावणयंत्र यांचे मोजमाप व नाव नोंदणी शिबीर दि. 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान पुढील वेळा पत्रकानुसार प्रत्येक तालुका पंचायत समिती मध्ये घेण्यात येईल –

1) 3/10/24 कुडाळ

2) 4/10/24 कणकवली

3) 5/10/24 वैभववाडी

4) 6/10/24 देवगड

5) 7/10/24 मालवण

6) 8/10/24 वेंगुर्ले

7) 9/10/24 सावंतवाडी

8) 10/10/24 दोडामार्ग

 

सोबत आणावायाची आवश्यक कागदपत्रे-

1) दिव्यांग प्रमाणपत्र

2) आधार कार्ड

3) यूडीआयडी कार्ड

4) उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ रेशन कार्ड

5) दिव्यांगत्व दिसेल असे 2 फोटो

 

शिबिर मधे तपासणी खालील प्रकार च्या दिव्यांग व्यक्ती साठी असेल.

 

दिव्यांग प्रकार आणि साहित्य आणि अपंग टक्केवारी खालील प्रमाणे

 

१ .अस्थीव्यंग – तीन चाकी सायकल ,

व्हील चेअर , काठी , कुबडी, सी. पी. चेअर किमान ४०% आणि वर दिव्यांग प्रमाणपत्

टिप- बैटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल साठी किमान ८०% दिव्यांग प्रमाण पत्र आवश्यक ( बहिरा , अंध, मतिमंद नसावा आणि दोन्ही हाथ सुस्थितीत असावे )

 

अंध प्रवर्ग ( १००% ) – प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थी साठी ब्रेल किट , अंध काठी .

इयत्ता १० पासून पुढे शिकत असल्यास

स्मार्ट. फोन आणि सुगम्य केन ( सेन्सर अंध काठी) शाळेत शिकत असल्याचा पुरावा शाळेचे / कॉलेजचे ओळखपत्र किंवा बॉनफाईड आवश्यक.

 

कर्णबधिर – कानाची मशीन

 

हाथ व पाय नसल्यास कृत्रिम अवयव चे मोजमाप घेऊन नंतर कृत्रिम अवयव बसविण्यात येतील …

 

अधिक माहिती साठी संपर्क करा . अनिल शिंगाडे

9765979450

DDRC

9322073992

रुपाली पाटील

9623883765

सूचना – सर्व कागदपत्र असल्यावरच तपासणी करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here