व्यापार वाढीकरीता देश विदेशातील व्यापा-यासोबत साखळी निर्माण करा – माजी केंद्रीय मंत्री डॉ सुरेश प्रभु
व्यापार वाढीसाठी देश विदेशातील व्यापाऱ्यांन सोबत गोव्यातील व्यापा-यानी साखळी निर्माण करावी. हे काम अमेझिंग गोवा सारख्या परिषदामुळे होण्यास मदत होईल. असे माजी केंद्रीय मंत्री डॉ सुरेश प्रभु यानी सांगितले.
अमेझिंग गोवा परिषद ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या तीन दिवसात गोव्यात होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल या परिषदेचे उदघाटन करणार आहेत. समारोप समारंभाला केंद्रीय पर्यटन मंत्री गजेन्द्रसिंह शेखावत उपस्थित राहणार असल्याची माहिती व्हायब्रेट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत यानी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ सुरेश प्रभु, अर्मन बैंकले व्हायब्रेट गोवाचे उपाध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते.
अमेझिंग गोवा परिषदेचे उदघाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ८ नोव्हेंबरला होणार आहे. ८ ते १० नोव्हेंबर असे तीन दिवस चालणा-या या परिषदेला १५ हजाराहुन अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच ३०० हुन अधिक परदेशी प्रतिनिधी सहभागी होणार असून या परिषदेत गोव्यातील बचत गटाचे प्रतिनिधी व उद्योजकही सहभागी होणार आहेत.
आयटी, कृषी, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि सायबर सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रे होणार आहेत. देश विदेशातील प्रतिनिधीकडून गुंतवणुक तसेच व्यापाराबाबत माहितीची देवाणघेवाण केली जाईल.