*प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर दीपक केसरकर यांच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ*

 

*प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर दीपक केसरकर यांच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ….*

गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली.. न्यू सालईवाडा, शिरोडा नाका या परिसरामध्ये दीपक केसरकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.. यावेळी सुरुवातीला श्रीदेव मुरलीधर मंदिरात श्रीफळ ठेवण्यात आले..

यावेळी शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब हे प्रामुख्याने उपस्थित होते.

दीपक केसरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. यावेळी शहरातील प्रत्येक घरात जात मंत्री दीपक केसरकर यांना विजयी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले..

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, गजानन नाटेकर, प्रतीक बांदेकर, अगस्तीन फर्नांडिस, सुजित कोरगावकर, भारती मोरे, कीर्ती बोंद्रे, शिल्पा सावंत, अनारोजिन लोबो, सुरेंद्र बांदेकर, अशोक पवार, गणेश कुडव, किरण नाटेकर, आशिष कदम, सत्यवान बांदेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here