गुळदूवेत १६ नोव्हेंबर रोजी देव विरेश्वर जत्रोत्सव…

 

गुळदूवेत १६ नोव्हेंबर रोजी देव विरेश्वर जत्रोत्सव…

*सावंतवाडी* : सावंतवाडीतील गुळदुवे येथील ग्रामदैवत श्री देव विरेश्वर सातेरी वार्षिक जत्रौत्सव *कार्तिक शुद्ध प्रतिपदेस शनिवार , दि. 16 नोव्हेंबर रोजी* संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सकाळी धार्मिक विधींना सुरुवात होईल. त्यात श्रींना *महाअभिषेक*, *केळी ठेवणे, ओट्या भरणे, गाऱ्हाणी, आदी विधी होतील. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य श्रींची पालखी मिरवणूक निघेल. रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळ ,आरवली-वेंगुर्ला यांचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी व भक्तगणांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here