सिंधुदुर्गनगरी ते अणाव मांजरेकरवाडी व जिल्हा कारागृहकडे जाणारा रस्ता अखेर पूर्ण…

*आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती, पंधरा दिवसातच पंधरा वर्षाची मागणी केली पूर्ण.*

 

कुडाळ | प्रतिनिधी

गेल्या पंधरा वर्षाची मागणी असलेल्या सिंधुदुर्गनगरी गरुड सर्कल ते अणाव मांजरेकरवाडी व ओरोस जिल्हा कारागृहकडे जाणारा रस्ता अखेर पूर्ण झाला असून या रस्त्याच ११ एप्रिल रोजी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाल होत. 

 

अणाव गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला हा रस्ता जिल्हा कारागृहकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठीही महत्वाचा होता. हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी अणाव ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले मात्र हा रस्ता दुर्लक्षितच राहिला होता. आमदार निलेश राणे यांनी ही समस्या लक्षात घेऊन या रस्त्यासाठी २८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व तत्काळ हा रस्ता पूर्ण करून घेतला आहे. याबद्दल अणाव ग्रामस्थ तसेच जिल्हा कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here