रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया व कुडाळ एम.आय.डी.सी. इंन्डस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नव तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्धी मार्गदर्शन व सहकार्य कार्यशाळा…

रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया व कुडाळ एम.आय.डी.सी. इंन्डस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नव तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्धी मार्गदर्शन व सहकार्य कार्यशाळा…

 

ग्रामीण भागातील लहान व मोठे व्यावसायिक एकत्रित येऊन संयुक्तिक बाजार पेठ निर्माण करण्याकरिता रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया च्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर चळवळ सुरु करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हातील उद्योगधंद्यांना चालना मिळावी, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या दृष्ट्रीने जिल्ह्यातील सुक्ष्म उद्योजकांना नव तंत्रज्ञान व बाजारपेठेशी जोडण्याच्या दृष्ट्रीने विशेष मार्गदर्शन कार्यशाळा मा. श्री. अतुल घुईखेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० एप्रिल २०२५, वेळ : सकाळी ११.३० वाजता विज कामगार भवन, नंदनवन पार्क, मधुरा आर्केड जवळ, कुडाळ-पिंगुळी रोड, पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ४१६५२८ येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेसाठी मा. श्री. श्रीकृष्ण परब, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चर, कोकण विभाग, मा. श्री. बाळासाहेब पाटील, संचालक, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया, मा. श्री. विनोद मर्गज, संचालक, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया, मा. श्री. संतोष टाले, कार्यकारी संचालक, कुसुम राम अॅग्रो प्रोसेसिंग इंन्डस्ट्रीज, शेगाव, जि. बुलढाणा, मा. श्री. चेतन पवार, कार्यकारी संचालक, ऑलीगन इंन्डस्ट्रिज, नाशिक, मा. श्री. जयंत पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीया, मा. श्री. प्रज्ञात दिवेदी, कार्यकारी संचालक, ई-व्हिकल अल्बेडो व्हिजन प्रा.लि. मुंबई, मा. श्री. शिवाजी देशमुख, कार्यकारी संचालक, शिवांजली हेअर आईल, वाशिम, मा. श्री. उत्तमराव शिंदे, सेंद्रीय शेती तज्ञ, संभाजी नगर, मा. श्री. झेड. के. जारवाल, सेंद्रीय शेती तज्ञ, संभाजी नगर आदी नामवंत क्षेत्रातील उद्योजक व विविध कंपनीचे संचालक यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार असून, योग्य इच्छुक लाभार्थ्यांना डीलरशीप मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. संतोष राणे, समन्वयक, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here