पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सावंतवाडी राजवाडा येथील सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उपस्थित राहून उपस्थित माता भगिनींना संबोधित केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संघर्षमय जीवनात केलेला प्रवास हा आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. जनहितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचा लोकाभिमुख कारभार आपल्यासाठी आदर्शवत आहे. त्यामुळे त्यांचे विचार घेऊन त्यादिशेने आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, माजी जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, डॉ. ज्योती तोरस्कर, आंबोली मंडल अध्यक्ष प्राजक्ता केळुसकर यांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.